कैवल्याचा आनंद

कैवल्याचा आनंद

आपल्याकडे भगवंतापेक्षा भक्ताला मान मोठा आहे. जेव्हा पालखी येते, तेव्हा विठ्ठल-विठ्ठ्लपेक्षा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम - `ग्यानबा तुकाराम', ग्यानबा तुकाराम ...

आपण सारे भारतीय आहोत!

आपण सारे भारतीय आहोत!

... प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाति-धर्मनिरपेक्ष अशी एकत्र येऊन करायची सामाजिक कामं कुठली? तिथे साऱ्यांचा सहयोग कसा लाभेल? टागोरांनी म्हटलंय, 'ऐक्य कर्मेरमध्ये- ऐक्य ए...

गोष्टीरूपं पु.लं.

गोष्टीरूपं पु.लं.

पु ल देशपांडे   दादरच्या एका हायस्कूलमध्ये एक शिक्षिका क्लासरुममध्ये पुस्तक वाचण्यात गढून गेल्या होत्या सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. शाळ सुरू व्हायला अजुन बराच वेळ होता. नेहमीप्रमाणे घ...

बाबा आमटे एक विज्ञानयोगी

बाबा आमटे एक विज्ञानयोगी

बाबा आमटे   "कुर्यात सदा मंगलम--" मी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला तो एक अद्भुत अनुभव होता. बाबा आमट्यांच्या आनंदवनात महारोगातुन मुक्त झालेली आठ जोडपी उभी होती. ए...

हे जग मी सुंदर करुन जाईन....

हे जग मी सुंदर करुन जाईन....

मित्रांनो, 'तो' मीच का 'तो मी नव्हेच' अशी शंका प्रेक्षकांनी कृपया घेऊ नये. तो 'मी'च पु. ल. देशपांडेच आहे. माझे मित्र श्री. वसंतराव कानेटकर यांनी माझी ओळख करुन देताना माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगि...

युजरनेम
पासवर्ड
सेव्ह
ई-मेल
ई-मेल
name
युजरनेम
पासवर्ड
again..
ई-मेल

चित्रपट गीते

काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते

सर्जा रं माझ्या ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं माझ्या

झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काट पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं


गीत - विठ्ठल वाघ
संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
चित्रपट - अरे संसार संसार (१९८१)

Read more...

तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते !

तुझ्या संगतीचा जिवा ध्यास लागे !
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते !

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !

कधी भक्त का पाहतो ईश्वराला ?
नदी न्याहळी का कधी सागराला ?
तिच्यासारखी मी सदा वाहते !


गीत - ग. दि, माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - जगाच्या पाठीवर (१९६०)

Read more...

निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला, झोप का ग येत नाही

गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर, झोपल्या ग जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई

रित्या पाळण्याची दोरी, उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले, माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता, गाऊ कशी मी अंगाई


गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७)

Read more...

ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा

भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा


गीत - शांता शेळके
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले

Read more...

आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभऱ्या गर्दीत मांडुन इवले घर

या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा थर
या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार

आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर


गीत - ना. धों. महानोर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - रवींद्र साठे, चंद्रकांत कुलकर्णी
चित्रपट - जैत रे जैत (१९७७)

Read more...

कैवल्याचा आनंद

आपल्याकडे भगवंतापेक्षा भक्ताला मान मोठा आहे. जेव्हा पालखी येते, तेव्हा...
पुढे वाचा...

आपण सारे भारतीय आहोत!

... प्रत्येक मुसलमान हा काही खोमेनीचा अनुयायी नाही. जाति-धर्मनिरपेक्ष अशी...
पुढे वाचा...

आणखी काही

मराठीजगत मंच ताजा कलम

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!! 2008/10/09 09:10 by admin
Galgale Nighale 2008/10/05 20:36 by Ganesh
मराठीत लिहायचे आहे? 2008/10/04 14:00 by admin

बाल जगत - गोष्टी आणि गंमत गाणी

झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा

एक लाकूडतोडया रानातले एक मोठे झाड...
पुढे वाचा...

उंदीर आणि चिचुंद्री

एक अशक्त व भुकेलेला उंदीर एका...
पुढे वाचा...

आणखी काही

या क्षणी मराठीजगत वर पाहिल्या जाणा~या चित्रफिती...